Hamza Saleem Dar World Record : क्रिकेटच्या खेळात रोज काही नवे विक्रम होत असतात, पण ज्या विक्रमाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केवळ एक विक्रम नसून एक महान विश्वविक्रम आहे. अशा विश्वविक्रमाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले नसेल. हा पराक्रम हमजा सलीम दार नावाच्या फलंदाजाने केला, ज्याने युरोपियन क्रिकेटच्या T10 सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले.
कैटलुन्या जगुआरच्या हमजा सलीमने सोहल हॉस्पिटलेटविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात क्रिकेटची ऐतिहासिक खेळी केली. हमजाने 43 चेंडूत 193* धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात त्याने 14 चौकार आणि 22 षटकार मारले.
T10 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. या खेळीदरम्यान हमजाने अवघ्या 24 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. या नाबाद खेळीत हमजाचा स्ट्राईक रेट 448.83 इतका होता.
𝗪𝗢𝗥𝗟𝗗 𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗 𝗞𝗡𝗢𝗖𝗞!🤯
Hamza Saleem Dar’s 43-ball 1️⃣9️⃣3️⃣ not out is the highest individual score in a 10-over match.😍 #EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/4RQEKMynu2
— European Cricket (@EuropeanCricket) December 6, 2023
या डावात हमजाने एका षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रमही केला. मोहम्मद वारिस याने डावातील नववे षटक टाकले. या षटकात एकूण 43 धावा झाल्या ज्यात 6 षटकार मारले गेले. ज्यात मोहम्मद वारिसने 6 नव्हे तर एकूण 9 चेंडू टाकले, ज्यात 2 वाइड आणि 1 नो बॉलचा समावेश होता. अशा प्रकारे हमजाने विश्वविक्रमी खेळी पूर्ण केली. सोहल हॉस्पिटलटेटचा गोलंदाज मोहम्मद वारिसने त्याच्या स्पेलमधील दोन षटकात सर्वाधिक 73 धावा दिल्या.
𝗪𝗢𝗥𝗟𝗗 𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗 𝗞𝗡𝗢𝗖𝗞!🤯
Hamza Saleem Dar’s 43-ball 1️⃣9️⃣3️⃣ not out is the highest individual score in a 10-over match.😍 #EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/4RQEKMynu2
— European Cricket (@EuropeanCricket) December 6, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कैटलुन्या जगुआर संघाने 10 षटकात एकही विकेट न गमावता 257 धावा केल्या. हमजा व्यतिरिक्त, सहकारी सलामीवीर यासिर अलीने 19 चेंडूत 58* धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सोहल हॉस्पिटलेट या संघाला 10 षटकांत 8 गडी बाद 104 धावाच करता आल्या. फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करणारा हमजा गोलंदाजीतही चमकला. गोलंदाजी करताना त्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लेउस डू प्लोय या खेळाडूच्या नावावर होता, ज्याने या वर्षी 5ऑक्टोबरला हंगरीसाठी 40 चेंडूत 163 धावांची खेळी केली होती.