पुणे | क्रिसेंट हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत यश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – क्रिसेंट हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत यशगुलटेकडी येथील दारूवाला एज्युकेशन सोसायटीच्या क्रिसेंट हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यावर्षीही दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. संस्थेचे चेअरमन आसिफ दारूवाला, आरिफ दारूवाला, फराह दारूवाला व हीना दारूवाला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यंदाच्या परीक्षेमध्ये एकूण १६८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह, तर ६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. कु. छाजेड सुविधी जयेश या विद्यार्थिनीने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम, खान उमेजा फिरोज ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मुठ्ठा साक्षी आनंद हिने ९२.६० टक्के गुण संपादित करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका डॉ. मारिया रॉड्रिक्स, उपमुख्याध्यापिका निलोफर शेख व एजाज विजापुरे यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक व पालकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
आहिल्यादेवी हायस्कूलाचा निकाल ९९.६८ टक्के
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स विद्यालयाचा निकाल ९९.६८ टक्के लागला आहे. ३७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. कार्तिकी संतोष तापकीर हिने ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रतीक्षा संजय आपटे हिने ९७.६० गुण मिळवून द्वितीय, तर आर्या संजय सांगळे हिने ९६.८० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
न्यू इंग्लिश स्कूलचा ९५.३७ टक्के निकाल
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचा ९५.३७ टक्के निकाल लागला आहे. ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. गौरांगी ठकसेन कनोजे हिने ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम, सार्थक रामचंद्र धुमक याने ९४.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, रोनित संजयकुमार सुतार याने ९२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के
शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. वैदही प्रमोद कुलकर्णी हिने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम, आयुष संकल्प इंगळे याने ९७.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर, अवनीश आशुतोष पानसे याने ९६.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.




