माहिममध्ये तिढा; महायुतीकडून अमित ठाकरेंना पाठिंबा मिळणार? व्हॉट्सअॅप स्टेट्सने चर्चांना उधाण

Amit Thackeray vs Sada Sarvankar | यंदा मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामधून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत देखील येथून निवडणूकीसाठी रिंगणात उभे असणार आहेत.
यादम्यान आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या काही नेत्यांनी माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे माहीममधून तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अमित ठाकरे यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं सूचक विधान शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. याशिवाय भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटावर येथील उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. Amit Thackeray vs Sada Sarvankar |
सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा
उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. Amit Thackeray vs Sada Sarvankar |
सदा सरवणकरांच्या लेकाचे व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत
यादरम्यान आता सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांचे व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत आले आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, “आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्तिथ राहावं.” त्यामुळे सदा सरवणकर हे तूर्तास तरी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये विजय मिळवला आहे. यंदाही शिवसेना शिंदे गटाने त्यांना माहिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र मनसेने येथे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने येथून निवडणूक लढवावी की अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असा प्रश्न महायुतीसमोर पडला आहे.
मंगळवार 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यानंतरच माहिममधील लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
पुढील वर्षीपासून देशात जनगणना सुरू होणार? ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय




