Amit Thackeray : महानगरपालिका निवडणूक काळात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. आज दुसऱ्यांदा त्यांच्या परिवाराची अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भेट घेतली आहे. सरवदे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी असेल, असेही त्यांनी (Amit Thackeray) सांगितले. भाजपच्या नगरसेविकेवर बाळासाहेब सरवदेंच्या हत्येचा संशय होता. त्यांना या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. सरवदे यांच्या हत्येनंतर राज्यभरातील मनसैनिकांनी या घटनेचा निषेध केला होता. Amit Thackeray ऐन निवडणुकीची धामधुम सुरू असतानाही मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोलापुरात जाऊन सरवदे कुटुंबाचे सांत्वन केले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे यांनी कुटुंबाची भेट घेतली आहे. कठीण प्रसंगात कार्यकर्त्याच्या कुटुंबामागे ठामपणे उभा राहणाऱ्या अमित ठाकरे यांच्या कृतीमुळे मनसे हा केवळ पक्ष नसून एक कुटुंब आहे, अशा भावना पक्षातील लोक व्यक्त करीत आहेत.