CPMचे नेता सीताराम येचुरी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

Sitaram Yechury | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. येचुरी यांना न्यूमोनियाच्या त्रासामुळे सायंकाळी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. एम्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. परंतु न्यूमोनियामुळे निदान झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शनिवारी उपचार करूनही त्यांची प्रकृती सुधारली नसल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. Sitaram Yechury |
सीताराम येचुरी कोण आहेत?
सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आहेत. सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. १९६९ मध्ये तेलंगणातील आंदोलनामुळे ते दिल्लीत आले. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले आणि त्यानंतर पीएचडीला प्रवेश घेतला. तेथेच त्यांनी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आणि राजकारणाला सुरुवात केली. Sitaram Yechury |
आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली त्यामुळे ते पीएचडी पूर्ण करू शकले नाहीत. जेएनयूला डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला बनवण्यात सीताराम येचुरी यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष याचा 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आशिष हे दिल्लीतील एका वृत्तपत्रात वरिष्ठ पत्रकार म्हणून काम करायचे. Sitaram Yechury |
राज्यसभेचे सदस्य
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले. यानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सदस्य झाले. 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून निवडून आल्यानंतर येचुरी पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. 18 ऑगस्ट 2017 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिलेत.
हेही वाचा:
“मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एलन मस्कला मंत्रीमंडळात स्थान देणार” ; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा





