पुणे | कोझी, ब्लॅक पब मालकांना हवाय जामीन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यावर बुधवारी (दि. २९) सुनावणी होणार आहे.
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचा पिता बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचा मालक नमन भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर),
ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम) आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.





