COVID-19 Update – देशात करोनाच्या नवीन प्रकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ४ मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्रातील २, दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून करोनामुळे ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये ३६ आणि महाराष्ट्रात ३१ आहेत. दिल्लीमध्येही १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचे ६४८३ सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १३८४ रुग्ण आहेत. गुजरातमध्ये ११०५ सक्रिय रुग्ण आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये ७४७ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी १६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.