Money laundering case : सचिन वाझेला न्यायालयाचा दिलासा, जामीन मंजूर मात्र…

मुंबई – मनी लॉंड्रींग प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला अखेर मुंबई सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. सचिन वाझेने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी अन्य प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.
सचिन वाझेला जामीन दिल्यास तो पुराव्याशी छेडछाड करु शकतो असे सांगत ईडीने जामीनाला विरोध केला होता. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला होता. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे.
Employment : राज्यात ऑक्टोबरमध्ये 21 हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार
दरम्यान, सचिन वाझेला कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.





