Cough Syrup: कफ सिरपमध्ये सापडले घातक रसायन ‘डायएथिलीन ग्लायकॉल’; मुलांच्या मृत्यूमागचं भयावह सत्य उघड

Cough Syrup: देशात अलीकडेच कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थानसह काही राज्यांमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्यानंतर मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. तपासात असे समोर आले आहे की या सिरपमध्ये एक जहरीला केमिकल डायएथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol – DEG) मिसळले गेले होते.
काय आहे डायएथिलीन ग्लायकॉल (DEG)?
डायएथिलीन ग्लायकॉल हे एक औद्योगिक सॉल्व्हेंट आहे, ज्याचा वापर साधारणपणे अँटीफ्रीझ, ब्रेक फ्लुइड आणि पेंट उद्योगात केला जातो. हे पदार्थ मानवासाठी अतिशय घातक आहे. परंतु काही बेपर्वा औषध निर्माता कंपन्या हे केमिकल कफ सिरपमध्ये मिसळतात, कारण ते स्वस्त आणि सहज उपलब्ध असते.
खरं तर कफ सिरपमध्ये प्रोपायलीन ग्लायकॉल हे सुरक्षित सॉल्व्हेंट वापरले जाते, पण ते महाग असल्याने काही उत्पादक त्याऐवजी DEG वापरतात.
DEG चा शरीरावर होणारा परिणाम
DEG शरीरात गेल्यानंतर ते किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम करतो. हे केमिकल शरीरात साचल्याने अंगातील अवयव नीट कार्य करू शकत नाहीत आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
- उलटी आणि जुलाब
- लघवी कमी येणे किंवा बंद होणे
- श्वास घेण्यास त्रास
- गोंधळ, बेशुद्धी किंवा भ्रम
- किडनी फेल होणे आणि मृत्यू
- लॅब तपासणीत हे आढळले आहे की काही सिरपमध्ये DEG ची मात्रा ४८.६ टक्के इतकी होती, जी अत्यंत धोकादायक आहे.
- पालकांनी घ्यावयाच्या काळजीच्या उपाययोजना
- मुलांना खोकला किंवा सर्दी झाली असल्यास खबरदारी घ्या.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप देऊ नका.
- मुलांना गरम दूध, वाफ (स्टीम) आणि उबदार घरगुती उपाय वापरा.
- सिरपची बाटली घेताना लेबल आणि कंपनीचे नाव नीट तपासा.
डायएथिलीन ग्लायकॉल हे स्वस्त असलं तरी जीवनासाठी घातक रसायन आहे. औषधांमध्ये अशा विषारी घटकांचा वापर टाळला नाही, तर अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. सरकारने अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांनी जागरूक राहणे हीच काळाची गरज आहे.




