एक महिन्याच्या आत चूक दुरुस्त करा; रिझर्व बँकेची इंडसइंड बँकेला सूचना

मुंबई – इंडसइंड बँकेची भांडवली परिस्थिती बळकट आहे. मात्र तरीही बँकेच्या संचालक मंडळाने इंडसइंड बँकेच्या व्यवहारात झालेली चूक एक महिन्याच्या आत दुरुस्त करून पर्यायी योजना सादर करावी, अशी सूचना रिझर्व बँकेने इंडसइंड बँकेला केले आहे.
बँकेच्या ताळेबंदामध्ये 2,100 कोटी रुपयांची त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गेल्या आठवड्यामध्ये या बँकेच्या शेअर एक वेळ 27% घसरला होता. गेल्या आठवड्यात इंडसइंड बँकेने यासंदर्भात माहिती रिझर्व बँकेला कळविली. संबंधित त्रुटीचा बँकेच्या मालमत्तेवर 2.35 टक्के इतका परिणाम झाला आहे. मात्र बँकेकडे यासाठी पर्यायी व्यवस्था असल्याचे बँकेने सुचित केले होते.
इंडसइंड बँकेने आता तिसर्या पार्टी कडून ऑडिट प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भातील प्रत्यक्ष माहिती संबंधित तपासणी अहवाल आल्यानंतर समोर येईल. दरम्यान बँकेच्या खातेदारांनी या संदर्भात संभ्रम बाळगण्याची गरज नाही.
बँकेची भांडवली परिस्थिती उत्तम आहे, असे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेच्या ग्राहकांना काळजी करण्याचे कसलेही कारण नाही असे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 16.46% आहे तर 70.20% कर्जाला हमी देण्यासाठी बँकेकडे पुरेशी तरतूद आहे.





