Pimpri: दोन लाखांच्या खंडणीसाठी नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी
Pimpri; आरोपीला अटक
Updated On:

पिंपरी – ‘तुझ्यामुळे माझ्या पान टपरीवर कारवाई केली. त्यामुळे तू मला दोन लाख रुपये दे, नाहीतर मी तूला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत नगरसेवक हर्षल ढोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. ही घटना २६ जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्याच्या समोरील नदी घाटावर घडली.
ऋतिक ऊर्फ फिरंग्या मुरलीधर सोळंके याला अटक केली आहे. सुरक्षा रक्षक भगवान रविदास भिंगारे (वय ३१, रा. मुळानगर, जुनी सांगवी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानटपरीवरील अतिक्रमाणाच्या कारवाईचा राग मनात धरून आरोपीने फोनवरून व प्रत्यक्ष भेटून नगरसेवकाकडे दोन लाख रुपये व दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहे.





