कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा | स्पार्टनची बाद फेरीकडे वाटचाल

पुणे – पहिल्या आयोध्या वॉरीयर्स करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्पार्टन क्रिकेट क्लब संघाने फ्रेन्डस् क्रिकेट क्लब आणि बीग मिशन फाऊंडेशन या संघांचा पराभव करून सलग दोन विजय नोंदवित स्पर्धेच्या बाद फेरीकडे वाटचाल केली.
स्पार्टन क्रिकेट क्लबने फ्रेन्डस् क्रिकेट क्लबचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने 20 षटकात 4 गडी गमावून 172 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान स्पार्टन क्रिकेट क्लबने 19.3 षटकात व 6 गडी गमावून पूर्ण केले. अष्टपैलू खेळी करणाऱ्या फ्रेन्डस् क्रिकेट क्लबच्या सोहम सरवदे याला सामनावीर किताब देण्यात आला. स्पार्टन क्रिकेट क्लबने बिग मिशन फाऊंडेशन संघाचा 7 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन संघाचा डाव 18.1 षटकात व 129 धावांवर आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना बीग मिशन फाऊंडेशनचा डाव 19.3 षटकात व 122 धावांवर गडगडला. स्पार्टन संघाच्या शिवराम गावडेने 23 धावात 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
गटसाखळी फेरी –
1) फ्रेन्डस् क्रिकेट क्लब ः 20 षटकात 4 बाद 172 धावा. (प्रफुल्ल मानकर नाबाद 57, सौरभ रवालिया 38, सोहम सरवदे 31, निशाद तगड 1-20) पराभूत वि. स्पाटर्न क्रिकेट क्लब ः 19.3 षटकात 6 बाद 173 धावा. (किरण देशमुख 54, अमित देशपांडे 32, भुषण सवे 29, सोहम सरवदे 3-25, अमित गणपुले 2-21). सामनावीर ः सोहम सरवदे.
2) स्पाटर्न क्रिकेट क्लब ः 18.1 षटकात सर्वबाद 129 धावा. (रॉबिन देव 38, अमित उमरीकर 3-24, दीपेन गांधी 3-32) वि. वि. बीग मिशन फाऊंडेशन ः 19.3 षटकात सर्वबाद 122 धावा. (हृषीकेश बडवे 54, आदित्य पाळंदे 22, शिवराम गावडे 4-23, निलेश तगड 3-24). सामनावीर ः शिवराम गावडे.





