Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत देशभरात करोनाचे 24492 नवीन रूग्ण; ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 24 हजार 492 नवीन रूग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे देशातील करोना रूग्णांचा आकडा आता 1 कोटी 14 लाखांवर गेला आहे.
करोना रूग्णांची संख्या 20 हजारापेक्षा अधिक होण्याचा हा सलग सहावा दिवस आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासात 131 करोना रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता एकूण 1 लाख 58 हजार 856 इतकी झाली आहे. सध्या देशात करोनाचे 2 लाख 23 हजार 432 सक्रिय बाधित उपचार घेत आहेत.
दरम्यान करोना संशयितांच्या चाचण्या घेण्याचे प्रमाणही सध्या वाढले असून सोमवारी एकूण 8 लाख 73 हजार 350 रूग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत 22 कोटी 82 लाख 80 हजार 763 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.





