गोमुत्र प्या – कोरोना पळवा : हिंदू महासभेच्या अध्यक्षांचा अजब सल्ला

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणिबाणी जाहीर केली आहे. चीनमध्ये आठ हजार जणांना याची बाधा झाली आहे. भारतातही एक रूग्ण आढळला आहे. डॉक्टर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. अशा वेळी हिंदु महासभेच्या अध्यक्षांनी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी अजब सल्ला दिला आहे…. गोमुत्र प्या गोमय (गाईचं शेण) थापा आणि कोरोना पळवा.
हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी म्हणाले, कोरोनाच्या विषाणू बाधीतांवर उपचार करण्यात गोमुत्र आणि गोमय उपयुक्त ठरू शकते. येवढ्यावरच त्यांचे धक्कादायक विधानांची मालिका थांबत नाही ते म्हणातात, एका विशिष्ठ्य यज्ञामुळे या विषाणूंचा नाश होईल. त्यामुळे जगापुढे निर्माण झालेल्या संकटाचे हरण होईल.
गोमुत्र प्यायल्याने या विषाणूचा शरीरात नाश होईल. तर अंगावर गाईचे शेण थापल्याने हे विषाणू शरीरात प्रवेश करणार नाहीत, जी व्यक्ती ओम नम: शिवायचा जप करेल ते या विषाणूपासून वाचतील. या विषाणूंचा नाश करण्यासाठी एका विशेष यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, असे चक्रपाणी यांनी सांगितले.





