आज रमजान ईद, पण साधेपणानेच
Updated On:

पुणे – रमजान ईद सोमवारी (दि.25) साजरी करण्यात येणार आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने, सामूहिक पद्धतीने नमाज पठण होणार नाही. मुस्लीम बांधवांनी घरच्या घरीच नमाज पठण करून साधेपणाने ईद साजरी करावी, असे आवाहन सीरत कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख म्हणाले, “करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठीच कमिटीने मुस्लीम बांधवांना घरच्या घरीच साधेपणाने ईद साजरी करण्याची विनंती केली आहे. शनिवारी (दि.23) ईदसाठीचे चंद्रदर्शन झाले नाही, म्हणून रविवारी (दि.24) रमजानचा तिसावा रोजा होता. त्यामुळे सोमवारी (दि. 25) रोजी ईद साजरी करण्यात येईल.’





