Coronavirus India : देशात गेल्या 24 तासात करोनाचे 7 हजार 350 नवे रुग्ण; 202 मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – देशात प्राणघातक करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 7 हजार 350 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 202 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 456 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 636 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7 हजार 973 जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 30 हजार 768 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.





