600 भारतीय मच्छिमारांचा टाहो… आम्हाला वाचवा

नवी दिल्ली : इराणमध्ये कोरोना विषाणूंची साथ पसरल्यानंतर तेथे तामिळनाडू आणि गुजरातमधून गेलेल्या 600 भारतीय मच्छीमारांनी त्यांना भारतात परत न्यावे म्हणून परराष्ट्र मंत्रालयाला साकडे घातले आहे.
इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 245 वर पोहोचली आहे. ऍनी यांचा पती इराणमध्ये राहतो. ऍनी यांनी सांगितले, त्याच्या पतीच्या उद्योगप्रमुखाने सांगितले की तुम्ही तुमच्या देशांत परत जा. मात्र येथून विमान सेवा नसल्याने त्यांना परत येणे शक्य नाही. इराणमध्ये काम करणाऱ्या अन्य एकाच्या पत्नीने सांगितले, तेथून विमाने रद्द केली आहेत. शिवाय तेथे मास्कची कमतरता आहे.
मच्छिमार संघटनेचे जॉन लिओनार्ड म्हणाले, सुमारे 600 भारतीय मच्छिमारांना इराणमधून भारतात परत यायचं आहे. मात्र विमान सेवा नसल्याने त्यांना परत येता येत नाही. “आम्ही चीरूमध्ये रहात आहोत. येथे कोरोनाची साथ पसरली आहे. येथे बहुसंख्य भारतीय हे गुजराती आणि तामिळनाडूतील आहेत, असा एक व्हाट्स ऍप मेसेजही त्यांनी दाखवला.





