CoronaUpdate : दिवसभरातील बाधितांचा आकडा 2 लाख 17 हजारांवर

नवी दिल्ली – करोनाबाधितांचा आकडा रोज नवीन विक्रम करीत असून गेल्या चोवीस तासांत देशातील बाधितांचा आकडा तब्बल 2 लाख 17 हजारांवर गेला आहे. देशातील सक्रिय बाधितांचा आकडाही पंधरा लाखांच्या पुढे गेला आहे. रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या पुढे जाण्याचा आजचा हा सलग दुसरा दिवस आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 1185 रुग्ण दगावले असून त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा आता 1 लाख 74 हजार 308 इतका झाला आहे. देशात सध्या 15 लाख 69 हजार 743 लोक सक्रिय बाधित आहेत. हे प्रमाण 10.98 टक्के इतके आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रांची संख्या सर्वाधिक असून गेल्या 24 तासांत महाराष्ट्रांत करोनाचे 61 हजार 695 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेशातील संख्या 22 हजार 339 इतकी आहे. मृतांच्या आकड्याच्या बाबतीतही महाराष्ट्रातील मृतांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत या राज्यात एकूण 349 रुग्ण दगावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.