पिंपरी – करोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कर्तव्यावर नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पुण्यातील दोन पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एकजण कावेरीनगर (वाकड) पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे.
पुण्यातील करोनाबाधित असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आल्यानंतर आणखी दोघे पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी एक कर्मचारी वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे.
याबाबत पुण्यातील “त्या’ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यास दुजोरा दिला आहे. तसेच वाकडमधील स्थानिक नगरसेवकाने याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेस कळविले आहे. यामुळे कावेरीनगर पोलीस वसाहतीमधील एक इमारत सील केली आहे.