करोनाचे नवे बाधित घटले, पण ‘क्रिटिकल’चा आकडा अजूनही चिंताजनक
Updated On:

पुणे – शहरात सोमवारी करोनाच्या 196 बाधितांची नोंद करण्यात आली. ही संख्या कमी झाली असून, क्रिटिकल आणि व्हेंटिलेटरवरील बाधितांची संख्या मात्र अजूनही जास्त आहे.
सध्या करोनाच्या क्रिटिकल रुग्णांची संख्या 386 आहे. यातील 224 व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील पाच जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत 1 लाख 74 हजार 209 झाली असून, त्यातील 1 लाख 64 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5059 असून, मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 4543 झाली आहे. दिवसभरात 1,921 स्वॅबटेस्ट घेण्यात आल्या.





