CoronaNews : काँग्रेस नेते सचिन सावंत यांना करोनाची लागण

मुंबई : राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील रुग्णालये भरली असून बेड मिळविण्यासाठी रुग्णांना धडपड करावी लागत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. तर काहींना दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याविषयी माहिती दिली.
सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलं की, “माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील करोनाच्या विळख्यात सापडले होते.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.🙏
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
मुंबईत सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी मुंबईत 5 हजार 888 रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.




