नांदेड जिल्ह्यातील 262 आरोग्य रक्षकांना कोरोनाची लस
Updated On:

नांदेड- नांदेड जिल्ह्यात कोरोणा लसीकरण मोहिमेला आज प्रारंभ करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आरोग्य रक्षकांना आज कोरोणाची मात्रा देण्यात आली.
जिल्ह्यातील लसीकरणाला आरोग्य रक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने लसीकरण करुन घेतले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्यामुळे पहिल्याच फेरीत संपूर्ण ग्रामीण भागात सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. आज दिवसअखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यात 262 आरोग्य रक्षकांनी कोरोनाची लस घेतली.




