पुणे (प्रभात वृत्तसेवा | Corona vaccination in Pune ) – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी दोन्ही कंपन्यांचे लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही मिळून 195 केंद्रांवर ( Corona government vaccination centers in Pune ) लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे 200 तर कोवॅक्सीनचे 300 डोस मिळतील.
कोविशील्ड लस ही 188 केंद्रांवर तर कोवॅक्सीन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची टक्केवारी जी 20 टक्के होती ती 15 टक्के करण्यात आली आहे.
तर ऑन दि स्पॉट बुकींची टक्केवारी 20 वरून 15 टक्के करण्यात आली आहे. तर कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
28 मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी जी लस मिळणार आहे त्याची टक्केवारी वाढवण्यात आली असून, ती 30 टक्क्यांवरून 35 टक्के केली आहे. शिवाय ऑन दि स्पॉट बुकींगही 30 वरून 35 टक्के करण्यात आले आहे.
23 जुलै ला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. Corona vaccination in Pune