कोरोनाचा धोका वाढताच! देशातील 24 तासातील बधितांची संख्या साडेतीन लाखाच्या पुढे; 2812 जणांचा मृत्यू
Updated On:

करोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 52 हजारांवर
नवी दिल्ली, दि. 26 – देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 3 लाख 52 हजार 991 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरातील मृतांचा आकडा 2812 इतका झाला आहे.
त्यामुळे देशभरात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 1 लाख 95 हजार 123 इतकी झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची संख्या जमा धरता देशातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता 1 कोटी 73 लाख 163 वर गेला आहे. तसेच देशातील सध्याच्या सक्रिय करोनाबाधितांची संख्या 28 लाख 13 हजार 658 इतकी झाली आहे. ही संख्या वाढत असतानाच कोविडचा रिकव्हरी रेटही खाली येत असून गेल्या चोवीस तासातील हा दर 82.62 टक्के इतका झाला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना रुग्णालय, औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यात अनेक राज्यांमध्ये अजूनही अडचणी निर्माण होत आहेत.





