करोनाच्या धसक्याने तुळशीबाग बंद
Updated On:

पुणे – शहरात करोना व्हायरसची मोठी दहशत निर्माण झाली आहे. यामुळे नेहमीच गर्दीने कायम फुलून जाणारे रस्ते ओस पडले होते. यानिमित्ताने तरुणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
करोनामुळे सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे नेहमीचे गजबजलेले आणि प्रचंड वाहतूक कोंडी असणारा तुळशीबाग मात्र ओस पडली आहे. कडक ऊन, करोनाची धास्ती आणि सुट्टी याचा फायदा घेत तरुणांनी रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.





