पुण्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण; शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४ वर
Updated On:

पुणे – पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.





