#corona effect : सोन्याच्या दरात मोठी घसरण
Updated On:

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये करोनाची मोठी धडकी भरली आहे. दरम्यान, करोनामुळे जगातल्या आर्थिक बाजाराला सुद्धा चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्याकाही दिवसापासून मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यामुळे सोने चांदीच्या दारात सुद्धा मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे.
आज (दि. 13) मुंबई शेअर बाजार उघडताच सोन्याच्या दरात तब्ब्ल 2600 रुपयंची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दरात सुद्धा घसरण झाली आहे. सोन्याचे भाव 41 हजार 556 रुपयांवर आला आहे. यापूर्वी सोन्याचा भाव 44 हजार 550 रुपये तोळा होता.





