करोना इफेक्ट! सोन्याच्या दरात तब्बल २ हजारांची विक्रमी घसरण
Updated On:

मुंबई – जागतिक मंदी आणि करोना व्हायरसमुळे शेअर बाजाराचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत पडली असून यामुळे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्यात तब्बल २ हजारांची विक्रमी घसरण झाली आहे. तर, चांदीचे दर प्रति किलो ६४४५ रुपयांनी घसरले आहेत.
माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य ३६ पैशांनी कमी झालं आहे. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे त्याचा फायदा सोन्याला झाला आहे. मागील १० दिवसांत सोन्याच्या किंमतीमध्ये ५ हजारांची घसरण झाली आहे.





