Mumbai : मुंबई विमानतळावर 7.9 किलो हेरॉईन जप्त

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने विदेशातून आणलेले 7.9 किलो हेरॉईन जप्त केले आहे. ( Cops seize 7.9kg heroin from passengers at Mumbai airport) आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे “डीआरआय’च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती.
संशयित प्रवाशांना ओळखल्यावर त्यांना रोखून धरत त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये अतिशय चतुराईने लपवून ठेवलेली हेरॉईनची काही पाकिटे सापडली. एकूण 7.9 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
U.S. FDA : जगातील सर्वात महाग औषधाच्या निर्मितीला मंजुरी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारातील यांची किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.या प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यामागे असलेल्या, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





