दिडघर स्मशानभूमीजवळ रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरीला
Updated On:

भोर – राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा तांब्याच्या तारा चोरीची घटना समोर आली आहे. मौजे दिडघर येथील स्मशानभूमीजवळील 100 के.व्ही.ए क्षमतेच्या रोहीत्रातून अज्ञात चोरट्यांनी 54 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या. ही घटना 15 ऑगस्टच्या रात्री 11 ते 16 ऑगस्टच्या सकाळी 8.30 या कालावधीत घडली.
याबाबत महेश संपत बांदल (वय 34, रा. सांगवी भाटघर, ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. फिर्यादीनुसार, चोरट्यांनी डी.पी. क्र. 4058070 असलेले रोहीत्र खाली पाडून ऑईल सांडवले आणि 90 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरल्या.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.




