“हुबेहूब सीन्स कॉपी”; ‘लापता लेडीज’वर ‘या’ विदेशी चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप; किरण राव ट्रोल

Laapataa Ladies | अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे.
‘बुर्का सिटी’ नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी किरण रावला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ज्यामध्ये ‘लापता लेडीज’ची कथा चोरल्याचं म्हटलं जात आहे.
‘रेडिट’ वर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टवरून हा चित्रपट ‘बुर्का सिटी’ चा कॉपी असल्याचं म्हटलं आहे. सध्या रेडिटवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये Fabrice Bracq च्या 19 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म ‘बुर्का सिटी’ चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Laapataa Ladies Copy of Burqa City |
View this post on Instagram
दोघांमध्ये एकच फरक
मिडल इस्टवर आधारित या चित्रपटात एक नवविवाहित पुरुषाची कथा आहे. ज्याच्या बायकोची बुरख्यामुळे आदला-बदली होते. त्यानंतर तो आपल्या बायकोला शोधण्यासाठी निघतो. त्यामुळेच अनेक नेटकऱ्यांना ‘बुर्खा सिटी’ची कथा ‘लापता लेडीज’ चित्रपटासारखी वाटतं आहे. दोघांमध्ये फरक एवढाचं आहे की, ‘लापता लेडीज’मध्ये घूंघट आहे आणि ‘बुर्खा सिटी’मध्ये बुर्खा आहे.
‘घूंघट के पट खोल’ सारखी देखील कथा
त्याशिवाय ‘लापता लेडीज’ची कथा ‘घूंघट के पट खोल’ चित्रपटाचीसारखी असल्याचं देखील अनेक नेटकरी म्हणत आहेत. १९९९ मध्ये ‘घूंघट के पट खोल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचं दिग्दर्शन अनंत महादेव यांनी केलं होतं. यासंदर्भात २०२४मध्ये अनंत महादेवन यांनी पोस्टही केली होती. Laapataa Ladies |
यावरून आता नेटकरी किरण रावला ट्रोल करत आहेत. ‘लापता लेडीज’ ओरिजनल नाही. तर हा चित्रपट दोन चित्रपटांचा कॉपी आहे,’ ‘इतकं असताना हा चित्रपट ऑस्करला पाठवला होता. कमीत कमी जे ओरिजनल आहे ते तरी पाठवायचं.’ ‘खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. हुबेहूब सीन्स कॉपी केले आहेत,’ असे म्हणत नेटकऱ्यांंनआय ट्रोल केले आहे.
दरम्यान, ‘लापता लेडीज’ चित्रपट ९७व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पाठवण्यात आला होता. तसेच गेल्या महिन्यात पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार २०२५’ मध्येही ‘लापता लेडीज’ चित्रपटाने १० पुरस्कार जिंकले होते. Laapataa Ladies |
हेही वाचा:
राज्य सरकारने ‘एक राज्य एक गणवेश’ योजना गुंडाळली; नेमकं कारण काय?





