नगर जल्लोष ट्रस्टला सहकार्य करा : जाधव

नगर (प्रतिनिधी) – जीवघेण्या या करोना आजरा पासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव प्रभावी उपचार आहे. यासाठी नगर जल्लोष सारखी सामाजिक संस्था पुढे येऊन नागारीकांना प्रतिकारशक्ती वाढवणारे होमियोपॅथी औषध मोफत उपलब्ध करून देऊन फार महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. कायम सामाजिक दावित्व निभावऱ्या नगर जल्लोष ट्रस्टला सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले.
नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने करोनापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तोफखाना येथील गुरुकृपा क्लिनिकच्या डॉ. भक्ती खोपे यांच्या सहकाऱ्याने नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवणारे होमियोपॅथी औषधांच्या गोळ्यांचे वाटप माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुरेंद्र खोपे, नगर जल्लोष ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, रत्नाकर श्रीपत, महावितरणचे उपव्यवस्थापक अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू , रोहित लाहोर, महेश बल्ला, निलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी आदि उपस्थित होते. यावेळी सुमारे 884 व्यक्तिना प्रतिकारशक्ती वाढवणारे होमियोपॅथी औषधांच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा म्हणले, नगर शहरात करोनाचा फैलाव वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक आता या रोगाला बळी पडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची प्रतीकारश्क्ती वाढली तर करोनापासून त्यांचा बचाव होईल. याच उद्देशाने नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने गुरुकृपा क्लिनिकच्या डॉ. भक्ती खोपे यांच्या सहकार्याने होमियोपॅथी औषधांचे वाटप केले.





