‘मनाचे श्लोक’ सिनेमाच्या नावावरून वाद; अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने घेतला मोठा निर्णय

Manache Shlok movie : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने दिग्दर्शित केलेल्या मनाचे श्लोक या सिनेमाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. १० अॅाक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अनेक शोज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले. त्यामुळे आता मृण्मयीने सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत आणि नावासाठी मोठा निर्णय घेतला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत तिने अपडेट दिली आहे.
या सिनेमाचे नाव श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक या नावाशी साधर्म्य असल्याने त्यास कडाडून विरोध होत आहे. अनेक हिंदुत्वादी संघटनांकडून सिनेमाच्या प्रदर्शावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने १६ अॅाक्टोबर २०२५ रोजी हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने दुःखही व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
‘नमस्कार… मनाचे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन पुणे, संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या घटना अतिशय दु:खद आहे. हे सगळं पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपुर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत. आता हा सिनेमा नवीन नावासह 16 ऑक्टोंबर 2025 रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे. भेटुयात!’ असे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने म्हटले आहे.
या सिनेनात मृण्मयी हि पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका करताना दिसणार आहे. तिच्याशिवाय या सिनेमात राहुल पेठे याची मुख्य भूमिका आहे. सिद्धार्थ मेनन, करण परब या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे आता मनाचे श्लोक सिनेमाला कोणते नवे नाव मिळणार यासाठी १६ अॅाक्टोबरची वाट पाहावी लागेल.
हेही वाचा : “१५ जागा लढवणार, चिरागला ‘ती’ जागा देणार नाही” ; जीतन राम मांझी यांनी भाजप हायकमांडला दिली यादी





