Satara: सुरक्षा ठेवींसाठी मक्तेदार संघटना आक्रमक
Satara सातारा जिल्हा मक्तेदार संघटनेच्या मागण्यांबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या मागण्या सोडवून प्रक्रिया सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सुरक्षा ठेवीच्या रकमा मिळण्यात अडचणी होत्या मात्र ही प्रक्रिया आता गतीने सुरु करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

Satara: ठेव चलनाने भरलेली रक्कम व बिलातून कपात झालेली रक्कम सुलभ पध्दतीने मक्तेदारांना मिळावी अशी मागणी सातारा जिल्हा मक्तेदार संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरक्षा ठेवी परत मिळण्यास अडचणी येत असल्याबाबत संघटनेने यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुरक्षा ठेव चलनाने भरलेली रक्कम व बिलातून कपात झालेली रक्कम सुलभ पध्दतीने मक्तेदारांना मिळावी, बयाना रक्कम चलन चार प्रतीत तयार करुन त्यापैकी एक प्रत मक्तेदारास मिळावी, बिलाच्या प्रती सब डिव्हिजल कार्यालयात मिळाव्यात आदी मागण्यासांठी संघटनेचे प्रशांत पवार, रोहन घाडगे, दिलीप फडतरे, उत्तमराव भोसले यांनी डॉ. प्रिया शिंदे यांची भेट घेवून संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा ठेवी मिळण्यात दिरंगाई होत आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही म्हणावी अशी गती मिळताना दिसत नाही. सध्य दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि अनेक कामांची बिले मिळत नसल्याने मक्तेदार आर्थिक अडचणीत येत आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा ठेवी गतीने मिळाल्या तर मक्तेदारांच्या अडचणी सुटणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने संघटनेच्या मागण्यांचा विचार करुन याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
सातारा जिल्हा मक्तेदार संघटनेच्या मागण्यांबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या मागण्या सोडवून प्रक्रिया सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सुरक्षा ठेवीच्या रकमा मिळण्यात अडचणी होत्या मात्र ही प्रक्रिया आता गतीने सुरु करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.





