पुण्यात दिवसभर संततधार; येत्या २४ तासांत जोर वाढणार

पुणे : पुण्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून, रस्ते जलमय झाले आहेत. संततधार पाऊस असल्याने फार ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले नाहीत. मात्र, येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागांत पुढील दोन दिवस अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसरात वडगावशेरी भागात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यानंतर पाषाण, डुडुळगाव याठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. वडगावशेरी भागात ४१.५ मिमी, पाषाण येथे ३७.२ मिमी, डुडुळगाव येथे ३६.५, ढमढेरे येथे २९.० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
पुणेकरांनो अशी घ्या काळजी
– वाहने सावकाश चालवा
– रस्ते निसरडे झाल्यामुळे सावधानता बाळगा
– वाहतूक कोंडीमुळे वेळेआधी निघा
– झाडाखाली उभे राहू नका
दिवसभरातील पाऊस ‘मिमी’ मध्ये
वडगावशेरी – ४१.५
पाषाण – ३७.२
डुडुळगाव – ३६.५
ढमढेरे – २९.०
शिवाजीनगर – २१.६
राजगुरूनगर – २०.५
चिंचवड – २०.५
हवेली – १९.०
तळेगाव – १७.०
मगरपट्टा – १४.५
नारायणगाव – १४.०
हडपसर – १२.५
निमगिरी – १०.०
बारामती – ७.०
लवासा – ५.५
भोर – ५.०
गिरीवन – ४.०
दौंड – ३.५
कोरेगाव पार्क – २.५
कुरवंडे – १.५
एनडीए – १.५





