भारत पाकिस्तानने दिली आण्विक संस्थांची माहिती
Updated On:

नवी दिल्ली : आण्विक संस्थांवरील हल्ले टाळण्यासाठी परस्परांच्या आण्विक संस्थांची माहिती भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना बुधवारी हस्तांतरीत केली.
एकमेकांच्या आण्विक संस्था आणि तेथील सुविधा यांची माहिती देण्यात येते. एका करारानुसार या माहितीचे हस्तांतरण गेली 29 वर्ष अव्याहत सुरू आहे, ती प्रक्रिया बुधवारी पार पाडण्यात आली, असे परराष्ट्र मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांच्या वतीने एकाच वेळी राजनैतिक पातळीवर ही प्रक्रिया घडते. दोन्ही देशातील संबंध काश्मिरच्या मुद्यावरून कमालीचे ताणले असतानाही ही प्रक्रिया पार पाडली हे विशेष. याबाबतचा करार दोन्ही देशांत 31 डिसेंबर 1988 रोजी झाला. तयाची अंमलबजावणी 27 जानेवारी 1991 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दरवर्षी एक जानेवारीला ही माहिती उभय देश हस्तांतरीत करतात.





