YouTube Creators : जगभरातील कंटेन्ट क्रियेटर्ससाठी Youtube हे सोशल मीडिया माध्यम अत्यंत महत्वाचे मानले जाते. आता क्रियेटर्ससाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यूट्यूबने आपल्या नियमात काही बदल केले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मॉनेटायझेश पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या नव्या नियमाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. आता नवीन नियमानुसार, जे कंटेंट क्रिएटर्स तेच ते व्हिडिओ अथवा कॉपी पेस्ट व्हिडीओ अपलोड करतात, त्यांच्यावर कारवाई करेल. नेहमी खरा आणि अधिकृत कंटेंट प्रसिद्ध करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म क्रियेटर्संना प्रोत्साहन देतो. युट्यूबवर मास्ट प्रोड्यूस्ड कंटेंट क्रिएटर्सला आता कंटेंट तयार करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. वेळोवेळी YouTube ने मूळ आणि खरा कंटेंट ओरिजिनल कंटेंट असल्याचे स्पष्ट केले आहे. जर व्हिडीओ नवीन नसेल कुणाला ढापला असेल तर त्याची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे जर युट्यूबवरून कमाई करायची असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. १५ जुलैपासून कंटेंट क्रिएटर्संना खरा आणि अधिकृत कंटेंट द्यावा लागणार आहे. कधीपासून नवीन नियम लागू होणार? मिळालेल्या माहितीनुसार, यूट्यूबने आपल्या पॅालिसीत करण्यात आलेला बदल १५ जुलैपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय शिक्षा होणार हे अद्यापर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही. कॅापी करण्यात आलेले कंन्टेटच्या तक्रारी यूट्यूबकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार व्हिडीओची पुनरावृत्ती शोधण्यासाठी युट्यूब कृत्रिम बुद्धिमतेचा म्हणजेच AI चा वापर करण्याची शक्यता आहे. हेही वाचा : “आपण कोणाशीही स्पर्धा करू शकतो, भारत मजबूत स्थितीत”, पियुष गोयल यांचे मोठे विधान