पिंपरी | कंटेनर घुसला बस स्टॉपमध्ये महिलेचे मृत्यू, विद्यार्थी गंभीर जखमी

वडगाव मावळ, (वार्ताहर) – भरधाव कंटेनर बस थांब्यामध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून दुचाकीस्वार सुदैवाने वाचला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 18) सकाळी 8.45 वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील कुडेवाडा, वडगाव नगरपंचायत हद्दीत घडला.
लता रणजित जाधव (वय 41, रा. कुडेवाडा, वडगाव मावळ) अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, दोन मुली व एक मुलगा असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडेवाडा बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते.
सकाळी 8.45 वाजता मुंबई बाजूकडून पुणे बाजूला जाणारा भरधाव कंटनर (क्रमांक एमएच 46 बीएफ 9157) हा बस थांब्यामध्ये घुसला. यात लता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
शाळेला जाणारे सृष्टी राजेंद्र भाटेकर (वय 15, केशवनगर), मैत्रिय संतोष भवर (वय 11, दिग्विजय कॉलनी), मृणाल संतोष भावर (वय 14) हे विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
तर, दुचाकीस्वार संदीप पिरणसिंह झालटे (वय 40) दुचाकीस्वार वाचाले आहेत. घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड व पोलिसांनी कंटेनर बाजूला केला.





