Ram Mandir : “अयोध्या आणि राम मंदिर ट्रस्टची बदनामी करण्याचा कट” – योगी आदित्यनाथ
अयोध्या नगरीला बदनाम करण्याचे आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कामकाजावर संशय निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

Ram Mandir – अयोध्या नगरीला बदनाम करण्याचे आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कामकाजावर संशय निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
मात्र, उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आणेल, असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
अयोध्या येथील श्री मणी राम दास छावणी येथे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या ८८ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राम मंदिराला मिळालेल्या देणगीच्या रकमेत अपहार झाल्याच्या आरोपांची सध्या एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
राम मंदिर ट्रस्टच्या देणगी वादाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या नगरीला बदनाम करण्याचे आणि श्री राम जन्मभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
जेव्हा जेव्हा भारत सकारात्मक दिशेने पाऊल टाकतो, तेव्हा तेव्हा षड्यंत्रकारी अस्वस्थ होतात आणि नवे कट रचू लागतात. आताही असाच एक कट रचला जात आहे.
मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी ३ सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. मंदिराच्या देणगीतून रक्कम गायब झाल्याच्या कथित आरोपांची हे पथक कसून चौकशी करत आहे.
आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, या चौकशीतून सर्व दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि कट रचणाऱ्यांचे चेहरे उघडे पडतील.





