पुणेकरांना दिलासा! बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

नवीन 4,587 रुग्णांची भर : 76 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 4 हजार 587 करोना बाधित आढळले असून, तब्बल 6 हजार 473 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसांतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. तर पुण्यातील 54 नागरिकांसह 76 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या 54 हजार 696 ऍक्टिव्ह बाधित असून, त्यापैकी 5 हजार 926 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 1 हजार 267 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत 3 लाख 71 हजार 824 पुणेकरांना करोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 3 लाख 10 हजार 965 रुग्ण बरेही झाले आहेत.
तर 6 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत 20 हजार 889 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे. तर आतापर्यंत 19 लाख 1 हजार 624 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात नव्याने 9,582 बाधित सापडले, तर 10,566 जण करोनामुक्त झाले. दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.





