Satara | काँग्रेस विधासभेसाठी वाईसह जिल्ह्यात चार मतदारसंघ मागणार

वाई, : येऊ घातलेल्या विधासभेसाठी वाईसह जिल्ह्यात चार मतदारसंघ मागणार असल्याचे काॅंग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांनी आढावा बैठकीत जाहीर केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथे संघटनेच्या कामासंदर्भात बैठक झाली.
बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे यांनी बैठकीचे नियोजन केले होते.
श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, कराड दक्षिण पाठोपाठ वाई तालुक्यात काँग्रेसचे संघटन बांधण्यात तालुकाध्यक्ष यशस्वी झाले आहेत .त्यामुळेच जिल्ह्यात विधानसभेसाठी प्राधान्य क्रमाने वाई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणार आहे, असे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष विलास पिसाळ यांनी वाईमध्ये संघटनेची बांधणी, बूथ कमिट्या,ग्राम कमिट्या कशा तयार केल्या याचा आढावा घेतला.
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी वाईमध्ये कोणत्याही मोठ्या नेत्याशिवाय अशी मजबूत संघटना बांधणे केवळ अशक्य असतानाही ते तुम्ही शक्य करून दाखवले, असे सांगत त्यांनी वाईतील काँग्रेस समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
जयदीप शिंदे यांची उमेदवारी काँग्रेसच्या सभासदांनी एकमताने मागितली आहे. तरीही महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचे काम करण्याची ग्वाही जयदीप शिंदे यांनी यावेळी दिली.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. विजयराव कणसे यांनी विचार मांडले. स्वागत आणि सूत्रसंचालन अतुल संकपाळ यांनी केले. महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, प्रदेश प्रतिनिधी धनश्री महाडिक,, जिल्हा सदस्या मंजिरी पानसे , खंडाळा तालुकाध्यक्ष ऍड. सारफराज बागवान ,एस. वाय. पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
कार्यक्रमासाठी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष ऍड. प्रतापसिंह पिसाळ- देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील बाबर, अन्सार मुजावर,फैयाज बागवान, युवकचे सचिन काटे , जिल्हा प्रतिनिधी रजिया शेख, मनिषा पाटील,मालन ताई परुळेकर, तसेच सुभाष घाडगे, संतोष गायकवाड महेश ढगे,
प्रविण निकम, संपत जाधव, राजकुमार जगताप, नामदेवराव दौड, हणमंतराव पिसाळ, अशोक दाभाडे शांताराम शिंदे, किरण दाभाडे, सुरेश तांबे, संभाजी कांबळे , माधवी तांबे, प्रकाश शिंदे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पिसाळ, सुनील भिसे असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





