विधानसभा विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार? उद्या पासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यातून बदललेली गणिते यामुळे महराष्ट्रच्या राजकारण एक वेगळी दिशा मिळाली आहे. अश्यातच आता (दि. १७ जुलै) उद्यापासून पावसाळी अधिवेशना सुरुवात होणार आहे. सध्या विधिमंडळातील समीकरणे बदलणार आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार महायुती सरकारचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्यामुळे सभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले.
दुसरीकडे विधान परिषदेतही ठाकरे गटाच्या काही सदस्यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तिथेही विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना मविआने विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय न घेतल्याने हा पेच अद्याप कायम आहे.
दोन्ही सभागृगात आपलाच विरोधी पक्षनेता असावा, यासाठी काँग्रेसने दावा ठोकल्याने नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र, आता यावर देखील मार्ग निघाला असून, उद्याच्या होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेसच विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याचे सांगितलं गेलं आहे. या संदर्भातील एक पत्रक देखील देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता विधानसभा विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसून येत आहे.
जयंत पाटील म्हणाले? वाचा….
“विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, आमच्याकडे १९ ते २० आमदार आहेत. तर काही आमदार दोन्ही गटाच्या बाजून देखील असल्याचं दिसून येत आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.





