कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेसची जेटलींना श्रद्धांजली

नवी दिल्ली: दिवंगत माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल कॉंग्रेसने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने आम्हाला तीव्र दुख: झाले असून आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, या शोकाच्या काळात आमच्या सद्‌भावना त्यांच्या पाठीशी आहेत असे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानचे मुख्यंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांनीही जेटली यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुख:द असून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्‍वर त्यांना देवो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थनाही गेहलोत यांनी केली आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या निधनाबद्धल तीव्र शोक व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.