निरर्थक बाता उपयोगाच्या नाहीत; ‘मन की बात’वर राहुल गांधींची टिप्पणी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात आपल्या सात वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करीत अनेक दावे केले आहेत. त्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून पलटवार करीत असल्या निरर्थक बाता कसल्याही कामाच्या नसतात असे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, करोनाच्या विरोधात परिणामकारकपणे लढायचे असेल तर सही नियत, निश्चय आणि नीती असली पाहिजे, महिन्यातून एकदा केली जाणारी निर्रथक बात कोणत्याही कामाची नाही. मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याने मोदींनी मन की बात या कार्यक्रमात आपल्या सात वर्षांच्या कारभारावर भाष्य केले होते.
पण राहुल गांधी आणि कॉंग्रेसने त्यावर सडकून टीका केली आहे. मोदींच्या मनकी बातवर राहुल गांधी यांनी वरील प्रतिक्रिया दिली असतानाच तिकडे कॉंग्रेस प्रवक्तेरणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत आकडेवारीची जंत्रीच सादर करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.





