सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान; भाजप नेत्याच्या घराबाहेर काँग्रेसचे निदर्शने

Srinivas BV on Vijay Shah | भाजपचे नेते तथा मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सरकारकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विजय शाह यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेस नेते मनोज शुक्ला त्यांच्या समर्थकांसह शाह यांच्या बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांच्या नावाच्या पाटीवर शाई फेकण्यात आली. बंगल्याच्या बाहेर तिरंगा फडकवत समर्थकांसह घोषणाबाजीही केली. घोषणाबाजी दरम्यान काँग्रेस नेत्यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विजय शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी
सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावर मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीही नाराजी व्यक्त केली. पटवारी म्हणाले, “भारतीय सैन्याने अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानी सैन्यातील ४०-४५ हून अधिकांचा खात्मा केला. पण मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले. आता मुख्यमंत्री मोहन यादव यांना स्पष्ट करावे लागेल की राज्य सरकार किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ या विधानाशी सहमत आहे का? आणि जर तसे नसेल तर विजय शाह यांना बडतर्फ करा.”
BJP सरकार के मंत्री विजय शाह द्वारा “कर्नल सोफिया कुरैशी को आतंकवादियों की बहन” बताने के विवादित बयान को लेकर कांग्रेस नेता मनोज शुक्ला ने साथियों के साथ उनके बंगले पहुंचकर नेम प्लेट पर कालिख पोती!
• विजय शाह जैसे नेता सत्ता के नशे में इतना गिर चुके हैं कि अब वो देश की बहादुर… pic.twitter.com/c3aiOe1i8q
— MP Congress (@INCMP) May 13, 2025
विजय शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाल्या. त्यानंतर विजय शाह यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले असून की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असा दावा केला आहे. शाह यांनी ‘कर्नल सोफिया त्यांच्या स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त आदरणीय आहेत. जर माझ्या कोणत्याही विधानामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी १० वेळा माफी मागण्यास तयार आहे,’ असे सांगितले. Srinivas BV on Vijay Shah |
काय म्हणाले होते विजय शाह ?
मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी सोमवारी इंदूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी शाह यांनी दहशतवाद्यांची बहीण म्हणून कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख केला. ज्यात विजय शाह म्हणाले, “ज्यांनी आपल्या बहिणींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल,” असे विजय शाह यांनी म्हटले. विजय शाह यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा :





