“चाय बोलो, चाय..”!! काँग्रेसने पंतप्रधानांचा चहा विकतानाचा AI व्हिडिओ केला पोस्ट ; भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया

Congress posts AI video of PM। काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक AI व्हिडीओ तयार करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेड कार्पेटवर चालत असून चहा विकताना दिसत आहेत. काँग्रेसच्या या कृतीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस प्रवक्त्या रागिनी नायक यांनी ही क्लिप पुन्हा पोस्ट केली, ज्यामध्ये मोदी एका जागतिक कार्यक्रमात चहा विकताना दिसत आहेत त्यांनी सोशल मीडियावर “अब ये कौन किया (आता हे कोणी केले?)” या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला. या पोस्टवर भारतीय जनता पक्षाकडून (भाजपा) तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. व्हिडिओमध्ये पंतप्रधान हलक्या निळ्या कोट आणि काळ्या पँटमध्ये, रेड कार्पेट कार्यक्रमात चहाची किटली आणि ग्लास घेऊन चालत असल्याचे दाखवले गेले आहे. Congress posts AI video of PM।
कॉंग्रेसने AI द्वारे तयार केलेला व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर हा वाद निर्माण झाला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेड कार्पेट कार्यक्रमासारख्या दिसणाऱ्या कार्यक्रमात चहा विकताना दिसत होते.
अब ई कौन किया बे 🥴🤣 pic.twitter.com/mbVsykXEgm
— Dr. Ragini Nayak (@NayakRagini) December 2, 2025
मोदींच्या AI वरील व्हिडिओवर भाजपची प्रतिक्रिया Congress posts AI video of PM।
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी,” रागिनी नायक यांची पोस्ट पंतप्रधानांच्या “भूतकाळा”ची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न आहे” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी असा दावा केला की, त्यांची टिप्पणी वारंवार घडणाऱ्या पद्धतीचा एक भाग आहे जिथे त्यांच्या मते, काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या सुरुवातीच्या आयुष्यावर कालच्या पातळीवर”ची टीका केली आहे.
After Renuka Choudhary insults Parliament & Sena now
Ragini Nayak attacks and mocks PM Modi’s Chaiwala backgroundNaamdar Congress cannot stand a Kamdar PM from OBC community who has come from a poor background
They mocked his Chaiwala background earlier too. They abused him… pic.twitter.com/Rg5VPXOp5K
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) December 3, 2025
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावरील क्लिपचा निषेध करत, “रेणुका चौधरी यांनी संसद आणि सेनेचा अपमान केल्यानंतर आता रागिनी नायक पंतप्रधान मोदींच्या चहावाल्या च्या भूतकाळावर हल्ला करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात. नामदार काँग्रेस गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या ओबीसी समुदायातील कामदार पंतप्रधानांना सहन करू शकत नाही.” असे म्हणत त्याच्यावर टीका केली. तसेच त्यांनी यापूर्वीही त्यांच्या चहावाल्या भूतकाळाची थट्टा केली होती. त्यांनी त्यांना १५० वेळा शिवीगाळ केली. त्यांनी बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवीगाळ केली. जनता त्यांना कधीही माफ करणार नाहीत.” असे देखील म्हटले आहे.





