कॉंग्रेसचे खासदार धीरज साहू ईडीपुढे हजर ! हेमंत सोरेन प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा
Updated On:

नवी दिल्ली – झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू शनिवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर झाले.साहू सकाळी ११ च्या सुमारास रांचीमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात प्रवेश करताना दिसले.या प्रकरणाचा हेमंत सोरेन यांच्याशीही संबंध जोडला जात आहे.
ईडीचे सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर अलिकडेच छापेमारी केली होती त्यात त्यांना एक महागडी कारही आढळून आली होती. त्या अनुषंगाने ईडीला साहू यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यासाठी त्यांना हे समन्स जारी करण्यात आले होते.
आयकर विभागाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओडिशास्थित बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर छापा मारला होता. तेथे कोट्यवधी रूपयांची रोकड आढळून आली होती. त्यावेळी ६४ वर्षीय साहू चर्चेत आले होते.





