सिमला – हिमाचल प्रदेशातील मतमोजणीनंतर कॉंग्रेस आमदार फुटण्याची अजिबात शक्यता नाहीं असा विश्वास राज्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुखविंदरसिंग सुखू यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आम्हाला या राज्यात यंदा प्रचंड बहुमत मिळण्याची आशा आहे. राज्यात अधांतरी स्थिती निर्माण होईल आणि कॉंग्रेसचे आमदार आम्ही फोडू असे जर भाजपला वाटत असेल तर त्यातील काहींही होणार नाही कारण राज्यात कॉंग्रेसलाच बहुमत मिळेल त्यामुळे अधांतरी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही आणि दुसरे कॉंग्रेसचा एकही नवनिर्वाचित आमदार फुटणार नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण असे विचारले असता ते म्हणाले नवनिर्वाचित आमदार एकमताने आणि हायकमांडच्या संमतीने आपला नेता निवडतील. कॉंग्रेस मध्ये आता कोणतीही गटबाजी उरलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यात कोणतीही प्रशासकीय क्षमता नव्हती आणि त्यांच्यावर रिमोट कंट्रोल होता असे ते म्हणाले.