Himachal Pradesh : कॉंग्रेस सरकार कर्ज घेते अन् सोनियांना देते – कंगना राणावत

शिमला – हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेस सरकार कर्ज घेते अन् ते पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना देते. त्यामुळे सरकारी तिजोरी रिकामी होते, असा आरोप भाजपच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी रविवारी केला. त्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
हिमाचल सरकारला आर्थिक चणचण भासत असल्याचे वृत्त अधूनमधून प्रसिद्ध होत असते. त्या पार्श्वभूमीवर, हिमाचलमधील एका गावात भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभ करताना कंगना यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.
भ्रष्टाचाराची व्याप्ती सर्वांनाच ठाऊक आहे. कॉंग्रेसच्या सरकारांनी संबंधित राज्यांना पोकळ करून टाकले आहे. तो पक्ष निवडणुकांवर प्रचंड खर्च कसा काय करतो याचे आश्चर्य वाटते. नैसर्गिक आपत्तीच्या घटना आणि कॉंग्रेस सरकारमुळे हिमाचल अनेक दशके मागे फेकले गेले. त्यामुळे हिमाचलमधील आताच्या सरकारला उखडून टाकण्याचे आवाहन मी जनतेला करते.
Bihar Land Survey : बिहारमध्ये भूमी सर्वेक्षणाला स्थगिती, नितीश कुमार सरकारचा निर्णय…
आपत्तीनंतर आपण मदत म्हणून निधी दिल्यास तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा व्हायला हवा. मात्र, तो सोनिया सहाय्यता निधीत जमा होतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. पुढे बोलताना कंगना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख युगपुरूष म्हणून केला.





