हिंगोली जिल्ह्यातुन कॉग्रेस हद्दपार ! हिंगोलीची जागा ‘ठाकरे गटा’कडे ; रुपाली पाटील-गोरगावकर यांना उमेदवारी जाहीर

हिंगोली : (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली विधानसभेची जागा महाविकास आघाडीत कॉग्रेस पक्षाकडे होती मात्र आता ही जागा शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे गेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हिंगोलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेवर तोडगा काढत अखेर ही जागा ठाकरे गटाकडे गेली आहे. या जागेवर ठाकरे गटाकडून रुपालीताई पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पहिल्यांदा मतपेटीवर कॉंग्रेसच्या हाताचे चिन्ह दिसणार नाही
हिंगोलीची जागा ही नेहमीच कॉंग्रेसची राहिली आहे, मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे ही जागा आता ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे कॉग्रेस पक्षाला नांदेड उत्तरमधून जागा द्यायची असल्यामुळे त्या जागेच्या बदल्यात हिंगोलीची जागा सोडणे सोयीचे वाटले. यंदा हिंगोली विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या हातचे चिन्ह पहिल्यांदाच मतदानपेटीवर दिसणार नाही. आज दिवंगत नेते राजीव सातव असते तर हि जागा 100% कॉग्रेस पक्षाला सुटली असती अशी चर्चा ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
हिंगोलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमूख बबनराव थोरात यांनी सांगितले की, “हिंगोलीच्या जागेसाठी आम्ही पहिल्या पासून आग्रह धरला होता. हिंगोलीची जागा काँग्रेसकडून घेताना त्या जागेच्या बदल्यात इतर ठिकाणी त्यांना जागा देण्यात आली आहे. त्यामुळे या जागा बदलाचा शिवसेना व कॉंग्रेसच्या संबंधावर काही एक परीणाम होणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष या जागेसाठी परिश्रम घेतली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. रुपालीताई गोरेगावकर यांना आव्हान देण्यातसाठी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे व कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व रामदास पाटील सूमठानकर हे सध्या मैदानात आहेत, मात्र आता कोणाचे उमेदवारी अर्ज मागें घेण्यात येतात यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





